Halal Products : हलाल सक्तीविरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या

एमपीसी न्यूज – भारतातील 80 टक्‍के हिंदु समाजावर (Halal Products) हलाल उत्‍पादनांची सक्‍ती आम्‍ही खपवून घेणार नाही म्हणत हलाल मुक्त दिवाली या अभियानांतर्गत पुण्यात सोमवारी (दि.17) बालगंधर्व रंगमंदिर येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्‍मारकाजवळ हिंदुराष्ट्र जागृती आंदोलन यांच्यातर्फे आंदोलन करण्‍यात आले.

यावेळी राज्य संघटकहिंदु जनजागृती समितीमहाराष्‍ट्र आणि छत्तीसगडचे सुनील घनवटसनातन संस्‍थेचे चैतन्‍य तागडेहिंदू जनजागृती समीतीचे पराग गोखलेअधिवक्ता नीलेश निढाळकरअधिवक्त्या सीमा साळुंखे आणि अन्य समविचारी संघटनानागरिक आदी उपस्‍थित होते.

Rain in Pimpri Chinchwad : परतीच्या पावसाचा धुमाकूळ; शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी

यावेळी बोलताना सुनील घनवट म्हणाले की, गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः हलाल’  उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे.

पूर्वी हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपूर्ती आणि मुस्‍लिम देशांच्‍या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखरतेलआटाचॉकलेटमिठाईसौंदर्यप्रसाधनेऔषधे आदी विविध उत्‍पादनेही हलाल सर्टिफाइड’ होऊ लागली आहेत.

मुळात भारत सरकारच्‍या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असताना वेगळ्‍या हलाल प्रमाणिकरणाची गरजच काय?

आज मॅकडोनल्‍ड्‌सकेएफ्‌सीबर्गरकिंगपिझ्‍झा हट यांसारख्‍या नामवंत कंपन्यांच्या आऊटलेटमध्‍ये हलाल नसलेले खाद्यपदार्थ उपलब्‍ध नसल्‍याने ते हिंदूजैनशीख अशा गैर-मुस्‍लिम समाजाला सर्रास हलाल’ खाद्यपदार्थ (Halal Products) सक्‍तीने विकत आहेत. भारतातील 15 टक्‍के मुसलमान समाजासाठी 80 टक्‍के हिंदु समाजावर हलाल उत्‍पादनांची सक्‍ती आम्‍ही खपवून घेणार नाही, असा इशारा घनवट यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.