Har Ghar Tiranga: सोशल मीडियावर प्रोफाइल फोटोवर झळकतोय तिरंगा,पंतप्रधानच्या आवाहनाला नेटकऱ्यांचा प्रतिसाद.

एमपीसी न्यूज: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रोफाइल फोटोवर भारताच्या तिरंगा ठेवत एकतेचे दर्शन दाखवले आहे.(Har Ghar Tiranga) 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तिरंगा प्रोफाइल फोटोवर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आपल्या सर्व सोशल नेटवर्क साईट वरचे प्रोफाइल फोटो बदलून भारतीय ध्वजाचे छायाचित्र ठेवले, व त्यांनी खास संदेश लिहिला आहे,’या वेळी आपण आझादी चा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आपल्या देशात प्रत्येक कुटुंबीय घरी तिरंगा फडकवतील व आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतील, ही एक सामूहिक चळवळ आहे व सर्वानी सज्ज राहणे अभिप्रेत आहे’.(Har Ghar Tiranga) असे आवाहन त्यांनी केले आहे, व ‘मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांना असे करण्याची विनंती करतो.’ असे देखील पंतप्रधानांनी देशवासियांना सांगितले आहे.

 

Pimpri Corona Update: शहरात आज 143 नवीन रुग्णांची नोंद; 144 जणांना डिस्चार्ज

 

दरम्यान अनेक सेलिब्रिटी व नेत्यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत फेसबुक,ट्विटर, इंस्टाग्राम वरचे प्रोफाइल डीपी बदलत तिरंग्याचे ठेवले आहेत.भारतीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याबाबत देखील खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाद्वारे केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.