Chinchwad : सामाजिक संस्थांतर्फे आयोजित आरोग्य शिबिरात 150 जणांना लाभ

एमपीसी न्यूज – चिंचवड केशवनगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये सामाजिक संस्था व डॉ. लाल पॅथोलॉजी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 150 जणांनी लाभ घेतला.

चिंचवड सदगुरु हॉल येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरेश्वर शेडगे, नगरसेवक सुरेश भोईऱ, बिभीषण चौधरी, महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे, आदी उपस्थित होते. प्राध्यापिका माधुरी गुरव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन मुकुंद गुरव, पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, अथर्व गुरव, गिरीश हंपे, महिला अध्यक्ष रोहिणी बच्चे, सौरभ कर्नावट, जुबेर शेख आदींनी केले.

कर्तव्य फाउंडेशन, श्री शारदा विद्या प्रसारक मंडळ, मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य मेडिको आदी संस्था सहभागी झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.