Pune News : उखाणा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना हेलिकॉप्टर राईडचे बक्षीस

एमपीसी न्यूज : नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन उखाणा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना हेलिकॉप्टर राईड बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. 

जनता वसाहत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एडवोकेट योगेश आढाव आणि निर्मल फाउंडेशन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जनता वसाहत परिसरातील महिलांसाठी योगेश आढाव यांनी नवरात्रोत्सवात ऑनलाइन उखाणा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 111 महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांना आज हेलिकॉप्टरची सफर करण्याची संधी मिळाली.

खराडी येथील हेलिपॅडवर भगवा फेटा बांधून या महिला तयारीनिशी उभ्या होत्या. त्यानंतर एकेक करून या सर्व महिलांना हेलिकॉप्टरची सफर घडवून आणली गेली. पंधरा मिनिटांची सफर केल्यानंतर या महिलांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान पाहायला मिळालं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.