Talegoan : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीद्वारा विद्यार्थीनींची हिमोग्लोबीन तपासणी

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी द्वारा स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थीनींकरिता मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबिर घेण्यात आले. 
याप्रसंगी क्लबचे खजिनदार सचिन कोळवणकर, डॉ. प्रणिता पवार, विन्स्टन सालेर, अँन. रुथ सालेर, ज्योती शिंदे , रो. डावरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शमशाद शेख, पर्यवेक्षिका रेणू शर्मा इ. मान्यवर उपस्थित होते.
रक्तातील हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे मुलींना अनेक आरोग्यविषयक तक्रारी असतात. तसेच हिमोग्लोबीनच्या प्रमाणाविषयी खूप उदासीनता असते हे लक्षात घेऊन रो. क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे विद्यमान अध्यक्ष गणेश काकडे व संस्थापक अध्यक्ष संतोष  खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील ५० विद्यार्थीनींची तपासणी यावेळी टेक्निशियन रुथ सालेर यांनी केली. हिमोग्लोबीनच्या प्रमाणानुसार डॉ. प्रणिता पवार यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना सालेर म्हणाल्या हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक व मानसिक तक्रारी निर्माण होत असल्याने विद्यार्थीनींनी आपल्या आहार विहार याची काळजी घ्यावी. डॉ. पवार यांनी विद्यार्थीनींना मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, तसेच हिमोग्लोबीन वाढीसाठी घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू शर्मा यांनी केले व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.