Hinjawadi : दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून अपघात; तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी रस्ता दुभाजकाला (Hinjawadi) धडकल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दुचाकी चालकावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.9) पहाटे पुणे मुंबई महामार्गावर बाणेर येथे घडला.

याप्रकरणी मयत मुलीचे वडील मोहन प्रल्हाद बराटे (वय 55 रा. भुसावळ ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून केदार राजाराम वाघमारे (वय 23 रा.मारुंजी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : एक लाख पुणेकर करणार रामरक्षा पठण – हेमंत रासने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी मेघा ही (Hinjawadi) केदार सोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी वेगाने दुचाकी चालवल्याने ती थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. यात केदारनाथ जखमी झाला तर मेघा चा या अपघातात मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.