Pune : एक लाख पुणेकर करणार रामरक्षा पठण – हेमंत रासने

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने (Pune)एक लाख पुणेकर स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या रविवारी सकाळी साडेसात वाजता रामरक्षा पठण करणार असल्याची माहिती निमंत्रक हेमंत रासने यांनी कळविली आहे.

रासने म्हणाले, भक्तिसुधा फाउंडेशन आणि समर्थ व्यासपीठ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीरामासाठी नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा तीन संकल्पांसाठी तीन वेळा पठण केले जाणार आहे.

Pune :128 व्या जयंती दिनी संग्रहालय महर्षी दिनकर केळकर यांना अभिवादन

स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या आश्रमातील शिष्य रामरक्षा पठणाचे (Pune)नेतृत्व करणार आहेत. लक्ष्मणाचार्य रचित रघुपती राघव राजाराम या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले जाणार आहे. आशिष केसकर यांचे संगीत असून चारुदत्त आफळे गायन करणार आहेत. अभिनेते राहूल सोलापूरकर रामजन्मभूमीचा इतिहास सांगणार आहेत. अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहनही रासने यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.