Hinjawadi Crime News : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सव्वा दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून बँकेच्या खात्यातील दोन लाख 25 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 4) दुपारी सव्वादोनच्या सुमारास बावधन येथे घडला.

मनीष अवधेश आनंद (वय 42, रा. बावधन, पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठविली. त्यानंतर दहा रुपयांचा रिचार्ज करण्यास भाग पाडले. मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने फिर्यादीच्या वडिलांच्या खात्यातील दोन लाख 25 हजार रुपये काढून घेऊन अज्ञात आरोपीने पैशांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.