Hinjawadi: पत्नीचे अनैतिक संबंध; पतीची गळफास घेऊन आत्महत्या, मुलानेच दिली फिर्याद

Hinjawadi: immoral relationship of wife; husband committed suicide, complaint filed by son आरोपी सावत्र आई हिने सावत्र काका व ड्रायव्हर यांच्याशी अनैतिक संबंध ठवले.

एमपीसी न्यूज- पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.13) दुपारी अडीचच्या सुमारास वडजाईनगर, माण रोड, हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 26 वर्षीय मुलाने वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिसांनी सावत्र आई, सावत्र काका आणि ड्रायव्हर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तरुणाची सावत्र आई आणि सावत्र काकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सावत्र आई हिने सावत्र काका व ड्रायव्हर यांच्याशी अनैतिक संबंध ठवले. याबाबत फिर्यादीच्या वडिलांनी फिर्यादीच्या सावत्र आईकडे विचारणा केली.

त्यावरून आरोपी सावत्र आईने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांकडे खोट्या तक्रारी करून फिर्यादी यांच्या वडिलांशी वाद घालून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले.

तसेच फिर्यादीचे सावत्र काका व ड्रायव्हर यांनी फिर्यादीच्या वडिलांना न जुमानता फिर्यादीच्या सावत्र आईसोबत अनैतिक संबंध सुरूच ठेवले. या तिघांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी शनिवारी (दि.13) दुपारी अडीचच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार फिर्यादीने केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.