Hinjawadi : मोटारीतून हात बाहेर काढून पादचारी तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- चालत्या मोटारीतून तरुणीचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली. या प्रकरणी शनिवारी (दि. 30) गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी एका 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून मोटारीतील दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तरुणी ही शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी येथील क्वाड्रन कंपनीजवळील रस्त्याने जात होत्या. दरम्यान (एमएच १४ सीके 2357) या मोटारीतून दोघे तिच्याजवळ आले. त्यातील एकाने मोटारीची काच खाली करून फिर्यादी यांचा हात पकडत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक देवताळे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.