Hinjawadi News : चेक बाउंस झाल्याचे सांगत 66 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयसीआयसीआय बॅंकेचा चेक बाउन्स झाल्याचे सांगून एका व्यक्तीची 66 हजार 196 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 फेब्रुवारी 2022 रोजी बावधन, पुणे येथे घडली.

अजयकुमार उमाशंकर राय (वय 47, रा. पौड रोड, बावधन, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 17) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयसीआयसीआय कंपनीचे कस्टमर केअर म्हणून बोलणाऱ्या 6371746179 या मोबाइल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांना मेसेज आला की, तुमचा आयसीआयसीआय बॅंकेचा 68 हजार 144 रुपयांचा चेक बाऊन्स आहे. त्यानुसार फिर्यादी यांनी आयसीआयसीआय कस्टमर केअर नंबर 9118601207777 यावर फोन करून चेक बाउन्स बद्दल माहिती घेतली. माहिती घेत असताना आरोपी याने “IMOBILE PAY’ हे ऍप्लीकेशन चालू करण्यास सांगितले त्यानुसार त्यातील प्रोसीड ओके म्हणून प्रक्रिया करा, असे सांगितले. फिर्यादीने त्यानुसार प्रक्रिया केली असता फिर्यादी यांच्या बॅंकेतील 66 हजार 196 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाले. पोलीस निरीक्षक सुनील दहीफळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.