Hinjawadi News : हिंजवडी येथून गुटखा विक्रेत्यास अटक; गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने हिंजवडी (Hinjawadi News) येथील एका गुटखा विक्रेत्यास अटक केली. विक्रेत्यासह टपरी मालकाच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी हिंजवडीमध्ये लक्ष्मी चौक रोड येथे करण्यात आली.

मुबारक जमीलअहमद शेख (वय 25, रा. भूमकर चौक, हिंजवडी. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. टपरी मालक अलीहसन हकीम (रा. लक्ष्मी चौक रोड, हिंजवडी) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तुषार शेटे यांनी फिर्याद दिली आहे.

Ravet News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हकीम याची पान टपरी आहे. ती टपरी आरोपी शेख हा चालवत होता. दोघांनी संगनमत करून टपरी मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री साठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारने शेख याला अटक केली. त्याच्याकडून 5 हजार 589 रुपयांचा गुटखा आणि गुटखा विक्रीतून आलेली 750 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.