Ravet News : पोलिसांच्या सतर्कतेमुळे वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका वासराची चोरट्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ही घटना आज (रविवारी) सकाळी सव्वातासच्या सुमारास रावेत (Ravet News) येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात काम करत असलेले पोलीस नाईक अमोल खुडे हे विकासनगरला राहतात, पण मॉर्निंग वॉकसाठी सकाळी रावेत (Ravet News) येथील बीआरटी रोड जवळील क्वीन्स टॉवर जवळ येत असतात. त्यांना एक रिक्षा भरधाव वेगाने जात असलेली दिसली.

त्यांना संशय आल्याने त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर लगेच पोलिसांचे पथक आले व त्यांनी रिक्षा पकडली. त्या रिक्षात तीन तरुण होते. त्यांच्याकडे एक वासरू आढळून आले.

New Year Photography Contest : तुम्ही नववर्षाचं स्वागत कसं केलंत? फोटो शेअर करा आणि जिंका चांदीची आकर्षक भेटवस्तू!

पोलिसांनी या संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून रावेत पोलीस ठाण्यात चौकशी चालू आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.