BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : भाड्याने घेतलेल्या मोटारीचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – भाडे करारावर घेतलेल्या मोटारीचे भाडे न देता फसवणूक केली. तसेच मोटारीचाही परस्पर अपहार केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे येथे घडली.

अमित राजू माने (वय 28, रा. मंगल भैरव बिल्डींग, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. स्वप्नील ज्ञानेश्‍वर पाडाळे (वय 25, रा. संभाजीनगर, म्हाळुंगे, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे 2019 ते 20 ऑगस्ट 2019 या कालावधीत आरोपी माने याने फिर्यादी स्वप्नील यांची एमएच 12 क्‍यूजी 2913 ही मोटार दरमहा 23 हजार 500 या प्रमाणे भाडे तत्वावर घेतली. मात्र, आत्तापर्यंत मोटारीचे भाडे आणि मोटार न देता फसवणूक केली. याबाबत स्वप्नील यांनी गुन्हा दाखल केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like