Hinjawadi : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाचे अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात हा चोरीचा प्रकार घडला.

निशिकांत राजाराम परीट (वय 66, रा. शिंदेवस्ती, गणेशनगर, रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परीट हे पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करीत होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील एक लाख 83 हजार 400 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.