Hinjawadi : किरकोळ कारणावरून हॉटेलमधील दोन आचा-यांना मारहाण

एमपीसी न्यूज – आचारी म्हणून काम करणा-या दोघा भावांना दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दोघे भाऊ जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भूगाव येथील हॉटेल वुड्रस येथे घडली.
राकेश संतराम नोटीयाला (वय 19, रा. बावधन, मूळ रा. हृषीकेश, डेहराडून) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयूर करंजवणे, योगेश करंजवणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राकेश आणि त्यांचा भाऊ मनीष भूगाव बावधन येथील वुड्रस हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. गुरुवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास राकेश यांनी त्यांच्या भावाला जेवणासाठी विचारले. त्यावेळी हॉटेलमध्ये शेवटच्या टेबलवर बसलेल्या आरोपी योगेश याने ‘तू कोण मला सांगणारा, हॉटेल बंद झाले आहे’ असे म्हणत राकेश यांना हाताने मारहाण केली.
त्यानंतर आरोपी दोघांनी मिळून लाकडी बांबूने राकेश आणि त्यांचा भाऊ मनीष दोघांना मारहाण केली. यामध्ये दोघंजण जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.