Hinjawadi : दुकानदार महिलेचे लक्ष विचलित करून दोन महिलांनी चोरल्या 18 साड्या!

एमपीसी न्यूज – कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या महिलांनी दुकानदार महिलेचे लक्ष विचलित करून सुमारे 48 हजार 348 रुपयांच्या 18 साड्या चोरून नेल्या. मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे ही घटना घडली.

वचनाराम तलसाराम चौधरी (वय 36, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी चौधरी यांचे सुसगाव येथे कापड दुकान आहे. तेथे आरोपी महिला कापड खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी महिलांना साड्या दाखवित असताना त्यांचे लक्ष विचलीत करून आरोपी यांनी सुमारे 48 हजार 348 रुपयांच्या 18 साड्या चोरून नेल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.