Yamunanagar : यमुनानगर येथे उत्तर भारतीय बांधवांसाठी बुधवारी ‘होली मीलन’ कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज –  होळी म्हणजे रंगांचा उत्सव. या दिवशी मुक्तपणे रंगांची उधळण करून आनंद द्विगुणित केला जातो. (Yamunanagar) व्यवसाय आणि कामा निमित्त पिंपरीचिंचवड शहरात स्थिरावलेले उत्तर भारतीय बांधव देखील होळीचा सण दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करतात.

सालाबाद प्रमाणे यंदाही उत्तर भारतीय बांधवांसाठी गुप्ता आणि जैस्वाल ऑल इंडिया फाउंडेशन, काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळाच्या वतीने ‘होली मीलन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 8) रोजी यमुनानगर येथील दुर्गानगर चौकातील सीजन बैंक्वेट लॉन येथे सायंकाळी 5 ते रात्री 10 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : पितृऋण’ उपक्रमाअंतर्गत रंगली संवादात्मक मैफल

खास उत्तर भारतीय समाज बांधवांसाठी आयोजित या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-संगीत, स्वादिष्ट भोजन, लहान मुलांसाठी खेळ अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमासाठी आयोजकांकडे सात तारखेपर्यंत पासेस उपलब्ध आहेत. (Yamunanagar) समाज बांधवानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक विजय गुप्ता, जितेंद्र गुप्ता, देवानंद गुप्ता, वकील गुप्ता, उमाशंकर गुप्ता, अशोक गुप्ता, शुभम सरपाले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.