Kartiki Ekadashi: अहमदनगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ चौधरी ,सविता चौधरी यांना आळंदी कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान

एमपीसी न्यूज : आळंदी मध्ये कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त लाखो वारकरी भाविकांची माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्याकरीता मोठी गर्दी निर्माण झालेली दिसून येत आहे.

माऊली मंदिराच्या महाद्वारात व मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. एकादशी दर्शन रांगेतील पहिले भाविक, कार्तिकी एकादशीचे यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ चौधरी (वय29) सीआरपीएफ जवान छत्तीसगड आणि सविता चौधरी आय टी कर्मचारी ( वय 25) या तरुण दाम्पत्याना महापूजेचा मान मिळाला. चौधरी दाम्पत्य पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील रहिवाशी आहेत.

Alandi : आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त दर्शन मंडपाबाहेर वारकरी भाविकांची मोठी रांग

यावेळी चौधरी दाम्पत्य म्हणाले अनपेक्षित असा हा योग घडून आला. आई वडिलांच्या पुण्याईमुळे व माऊलींच्या कृपेमुळे हे घडून आले. सर्वांना सुखी ठेव असे मागणे माऊलींकडे त्यांनी यावेळी मागितले.

त्यांचा सन्मान देवस्थान प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,विश्वस्त विकास ढगे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा हा ग्रंथ देऊन करण्यात आला. या कार्तिकी एकादशी निमित्त आमदार दिलीप मोहिते पाटील,महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, प्रांत आधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव,वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सोहळा मालक बाळासाहेब पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राष्ट्रवादी नेते डी डी भोसले, माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे, राहुल चिताळकर,योगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे,विठ्ठल घुंडरे,पुष्पाताई कुऱ्हाडे, डॉ. ऊर्मिला शिंदे,सागर भोसले व वारकरी भाविक, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.