Pimpri News : दत्तक बालकांना ‘होप’च्या वतीने दिवाळी निमित्त कपडे आणि मिठाई वाटप

एमपीसी न्यूज – पुण्यातील होप फाउंडेशनच्या वतीने दत्तक घेतलेल्या बालकांना दिवाळीसाठी नवीन कपडे, मिठाई व दिवाळीचे इतर साहित्य वाटप करण्यात आले. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त कॅप्टन शिवाजी मोकाशी तसेच, कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन व महिला पोलीस नागरिक मित्र अमृता वैद्य आणि वाय सी एम रुग्णालयाचे ए आर टी सेंटर प्रमुख डॉक्टर कुणाल घुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मंचर इप्पर यांनी होप फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेत उपक्रमाचे कौतुक केले. निवृत्त कॅप्टन शिवाजी मोकाशी यांनी पुढील महिन्यासाठी लागणारे धान्य देण्याची ग्वाही दिली.

होप फाउंडेशन मागील चार वर्षापासून एच आय व्ही बाधित लहान मुलांसाठी काम करत आहे. ज्या मुलांचे आई-वडील या आजाराचे बळी पडले व या मुलांच्या मायेचा छत्र हरविला अश्या 150 हून अधिक मुलांना संस्थेमार्फत पौष्टिक आहार व शैक्षणिक साहित्य दरमहा दिले जाते.

कार्यक्रमाचे आयोजन होप फाऊंडेशन, पुणे विभाग प्रमुख, पोलीस मित्र विनायक खोत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन मानव, प्रास्ताविक विहान संस्थेच्या आशा घोडके व आभार अभिजित आजगेकर यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.