Akurdi News : आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली उडी मारून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी घडली.

महेंद्र भालेकर (रा. तळवडे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

रेल्वे पोलीस संजय लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती सकाळी रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.