Shivraj Hotel : आयएसओ मानांकन प्राप्त हॉटेल ‘शिवराज’मध्ये ‘बैलगाडा मटन आणि चिकन थाळी’

एमपीसी न्युज – हृदयाचा रस्ता पोटातून जातो असे म्हटले जाते. जर मनसोक्त जेवणाने पोट तृप्त झाले तर मनही तृप्त होते आणि तीच चव पुन्हा पुन्हा चाखण्याची इच्छा होते. या उक्ती वडगाव मावळ येथील ‘हॉटेल शिवराज’मध्ये सार्थ ठरतात. (Shivraj Hotel) आपल्या चविष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण थाळ्यांसाठी प्रसिद्ध झालेल्या तसेच राज्याच्या कानाकोऱ्यांतून खवय्यांना मावळात येण्यास भाग पाडणाऱ्या ‘हॉटेल शिवराज’ने आणखी एक भन्नाट थाळी सुरू केली आहे. मावळ परिसरात अनेक बैलगाडाप्रेमी आहेत. त्यातच हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांना घरातूनच बैलगाडा विषयी प्रेमाचा वारसा मिळाल्याने त्यांनी ‘बैलगाडा मटन थाळी’, ‘बैलगाडा चिकन थाळी’ सुरू केली आहे.

गौरी गणपती, श्रावण, दसरा, दिवाळी यात मांसाहारप्रेमींना मनावर दगड ठेवून शाकाहार करावा लागल्याने मांसाहार प्रेमींना शिवराजची ‘बैलगाडा मटन आणि चिकन थाळी’ पसंत पडणार यात काहीच नवल नाही. ही थाळी जर एखाद्याने एका तासात संपवली तर त्याला 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे अस्सल खवय्यांसाठी तर ही अचूक संधी आहे. कोरोनाच्या काळात अतुल वायकर यांनी अन्नदान, आर्थिक मदत आणि अन्य उपक्रमांमधून भरपूर सामाजिक कार्य केले आहे.

चार ते पाच जणांना पुरेल अशा या थाळीत मटन बिर्याणी, मटन हांडी, मटन रस्सा, मटन सुक्खा, चिकन तंदूर, बांगडा फ्राय, मांदेली फ्राय, अंडा बॉईल, भाकरी 5, रोटी 5, ग्रीन सलाड, फ्राय पापड, बिस्लेरी 2 एवढा भलामोठा मेनू येणार आहे. याची किंमत बैलगाडा चिकन थाळी 1500 तर बैलगाडा मटन थाळी 1800 रुपये एवढीच असणार आहे.

Urban Skyline : ‘अर्बन स्कायलाईन’मध्ये ‘लॅवीश’ फ्लॅट बुक करा आणि साजरी करा ‘सुवर्ण दिवाळी’!

 

स्पेशल रावण थाळी, बकासूर कडकनाथ थाळी, सरकार मटण थाळी, पैलवान मटण थाळी, मालवणी फिश थाळी, बुलेट थाळी या स्पेशल थाळ्यांनी हॉटेल शिवराज मध्ये येणा-याचे स्वागत केले जाते. या हॉटेलची स्पेशालिटी असणाऱ्या पैलवान थाळीमध्ये दोन जण, सरकार थाळीमध्ये पाच ते सहा जण, बकासूर कडकनाथ थाळीमध्ये पाच ते सहा व मालवणी फिश थाळीत दोन ते तीन लोकांचे पोट भरून जेवण होत असल्याने युवकांची या शिवराज स्पेशल मोठ-मोठ्या थाळ्यांना खूप पसंती मिळत आहे. (Shivraj Hotel) वेगवेगळ्या सणांमध्ये व सुट्टीच्या काळात हॉटेलमध्ये आकर्षक डिस्काउंट असतो. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या नावांच्या या थाळ्या समोर आल्यावर पहिल्यांदा त्या बघूनच आपण तृप्त होतो. त्यात त्यांची चव घ्यायला सुरुवात केली की दोन घास जेवण जास्तच जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. मनसोक्त आणि चविष्ट मांसाहारी पदार्थ आणि ते देखील वाजवी किंमतीत म्हणजे हॉटेल शिवराज ही नवी ओळख सध्या बनली आहे.

येथे याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पापलेट, सुरमई, मांदेली, प्रॉन्स, चायनीज, कबाब, तंदुरी डिशेस देखील उपलब्ध आहेत. तसेच खास गावरान चव चाखायची असेल तर चुलीवरची ज्वारी व बाजरीची भाकरी आणि मावळची खासियत असलेला इंद्रायणी तांदुळाचा चविष्ट आणि सुगंधी भात देखील मिळेल.

या हॉटेलमध्ये फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था आहे. त्यामुळे इतर हॉटेलपेक्षा सहकुटुंब जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक शिवराज हॉटेलला विशेष पसंती देतांना दिसत आहेत.(Shivraj Hotel) या यशाबद्दल हॉटेल व्यावसायिक अतुल वायकर यांना विचारले असता ते एकच सांगतात की, एकदा या आणि आमचे पदार्थ चाखून बघा. मी अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या भांडवलात वडगावमध्ये प्रथम शिवराज हॅटिल नावाने व्यवसायास सुरवात केली. हे हॉटेल छोटेसे होते; पण येथील गावरान चिकन हंडीने खवय्यांची मने जिंकली. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली.

ग्राहकांच्या गर्दीमुळे या छोट्या हॉटेलमध्ये जागा कमी पडू लागल्याने त्यांनी पुणे-मुंबईमहामार्गालगत नायगाव येथे २०१२ साली पूर्वीपेक्षा मोठे हॉटेल सुरु केले.(Shivraj Hotel) व्यवसाय उत्तम सुरु होता यामुळे पैसे हाती येऊ लागले. अतुल वायकर यांनी आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा असल्यावर गरज आहे त्यांना आपण मदत करणे ही सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यास सुरुवात केली.

मावळातील आदिवासी भागातील लोकांना कपडे वाटप करणे, कुपोषित बालकांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करणे, गरीबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून दिवाळीत फराळाचे वाटप करणे, दुर्गम भागातील आदिवासी व दुर्लक्षित वस्तीवर जाऊन त्यांना वैद्यकीय सेवा पुरविणे,(Shivraj Hotel) वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, वृक्ष लागवड, गड किल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबविणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, अनाथांना आश्रय देणे; तसेच सामाजिक समस्या व अन्यायाविरुद्ध शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन जाब विचारणे आदी सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यामुळे अतुल वायकर म्हणजे ‘आपला माणूस’ अशी त्यांची ओळख परिसरात निर्माण झाली आहे.

या प्रवासात त्यांना अनेक अडचणी आल्या. अनेकदा अपयश आले. अशा परिस्थितीत अतुल वायकर यांचे मेहुणे विलासराव काळोखे व ज्येष्ठ बंधू श्रीकांत वायकर यांनी त्यांना मोलाची साथ देत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या व अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या अतुल यांना आर्थिक, (Shivraj Hotel) मानसिक व सर्व प्रकारची मदत करत यातून बाहेर पडण्यास पाठिंबा दिला व एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्यास मदत केली. यामुळे अतुल वायकर हेआपले मेहुणे व ज्येष्ठ बंधूंना गुरु मानून यशाची शिखरे सर करीत आहेत. याच काळात बंडोपंत राजाराम निकम यांच्या मोलाच्या सहकार्याने वडगाव येथे नवीन हॉटेल सुरु करणे शक्य झाले.

सहा वर्षांपूर्वीच अतुल वायकर यांनी वडगाव येथील पुणे- मुंबई महामार्गालगत हॉटेल शिवराजची स्थापना केली. वडगाव मावळ येथील हॉटेल शिवराजमधील सर्व सुविधांमुळे व चविष्ट खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता व अचूकतेसाठी आयएसओकडून प्रमाणित करण्यात आलेले आहे. (Shivraj Hotel) त्यामुळे मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असलेले शिवराज हॉटेल त्यांच्या गुणवत्तेसाठी खूप लोकप्रिय झाले आहे. त्यांचे यश पाहून अनेक युवक हॉटेल व्यवसायात येण्यापूर्वी त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत; तर महाविद्यालयीन तरुण प्रकल्पासाठी शिवराज हॉटेलला भेटी देत आहेत.

हॉटेल शिवराज,

जुना पुणे – मुंबई हायवे, भेगडे लॉन्सजवळ,

वडगाव मावळ, तालुका – मावळ, जि. पुणे.

दूरध्वनी क्रमांक – 9561929999, 9764587799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.