दागिने व पैशाचा अपहार केल्याप्रकरणी पतीने केली पत्नी विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज – पत्नीने दागिने आणि रोख रकमेचा अपहार केला. दागिने आणि पैसे घेऊन पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी व्यक्तीची पत्नी (वय 31) आणि तिचा प्रियकर तौफिक रियाज राही (वय 59) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : किरकोळ कारणावरून मारहाण करत लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीचे आरोपी तौफिक याच्यासोबत लग्नापूर्वी पासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या वयातील फरकामुळे त्यांना लग्न करणे शक्य नव्हते. त्यामुळे महिलेने फिर्याद सोबत लग्न केले. लग्नानंतर देखील तिने तौफिक याच्यासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. दरम्यान तौफिक याने एका अनोळखी महिलेला फिर्यादीस फोन आणि मेसेज करून फिर्यादीचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. आरोपींचा तो प्रयत्न यशस्वी न झाल्याने फिर्यादींची पत्नी सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, अंगठी, कानातले टॉप्स, बाळाच्या गळ्यातील क्रॉस आणि रोख रक्कम असा 49 हजार 800 रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी तौफिक याच्या सोबत पळून गेली. तिने दागिने आणि पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.