Ajinkya Rahane : मला वन-डे संघात पुनरागमन करायचं आहे – अजिंक्य रहाणे

'I want to return to the ODI team.' - Ajinkya Rahane.

एमपीसी न्यूज – वन-डे संघात मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मग सलामीची जागा असो किंवा चौथ्या क्रमांकावरची जागा…मी तयार आहे. माझं मन मला सांगतंय की मला वन-डे संघात पुनरागमन करायचंय. पण ही संधी कधी मिळेल हे मला माहिती नाही असे मत फलंदाज अजिंक्य रहाणे याने बोलून दाखवलं आहे.

ईएसपीएन क्रिकेट या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मी सज्ज आहे. सलामीला किंवा चौथ्या स्थानावरही फलंदाजी करण्याची माझी तयारी आहे.

माझा अंत:प्रेरणेवर विश्वास असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन याची खात्री आहे. संधी कधी मिळेल हे सांगता येणार नाही. मात्र तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सज्ज आहे. असे 32 वर्षीय  फलंदाज रहाणेने सांगितले आहे.

भारताकडून 65 कसोटी खेळलेला रहाणे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटदेखील गेल्या चार वर्षांत खेळलेला नाही. एकदिवसीय क्रिकेट सामना देखील फेब्रुवारी 2018 मध्ये खेळला होता.

भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवणे हे नेहमीच स्पर्धात्मक असते. एकदिवसीय संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा-शिखर धवन जोडीसह चौथ्या स्थानासाठी श्रेयस अय्यर यांची स्थाने पक्की आहेत. या स्थितीत रहाणेसमोर एकदिवसीय पुनरागमन सोपे असणार नाही.

दरम्यान, अजिंक्य रहाणे सातत्याने चांगली कामगिरी करत असताना देखील त्याला अचानक वन-डे संघातून बाहेर काढण्यात आलं.

ज्याप्रमाणे आपण दुधात पडलेली माशी बाहेर काढतो त्याप्रमाणे अजिंक्यला वागणूक देण्यात आली.

अजिंक्यवर हा अन्याय असल्याचे मत आकाश चोप्रा यांनी आपल्या यु-ट्यूब चॅनलवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना मांडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.