Chakan Crime News : ‘ग्रामपंचायत निवडणुकीला तुमच्या घरातील महिला उभी राहिल्यास बलात्कार करीन’

चाकणजवळ संतापजनक प्रकार

एमपीसी न्यूज – ‘ग्रामपंचायत निवडणुकीला तुमच्या घरातील महिला उभी राहिल्यास बलात्कार करीन’, अशी धमकी देत महिलेचा विनयभंग केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. 

याप्रकरणी पीडित महिलेनं शुक्रवारी (दि.12) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी हर्षल राजाराम खराबी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या दिराला शिवीगाळ करत ढकलून दिले व जबरदस्ती घरात प्रवेश केला. महिलेनं आरोपीला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, आरोपी महिलेच्या अंगावर धावून गेला व ‘ग्रामपंचायत निवडणुकीला तुमच्या घरातील महिला उभी राहिल्यास बलात्कार करीन’, अशी धमकी दिली. तसेच, दरमहा दहा लाख रुपयांची खंडणी मागितली व जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चित्तमपल्ले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.