Pune News: मुख्यमंत्रीपदी सक्षम महिला नेतृत्व पुढे आल्यास त्याचे स्वागतच – चंद्रकात पाटील

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचा नवदुर्गा सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज – महिलांनी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर व्हावे. त्यांनी पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यास सक्षम व्हावे. कोणतेही क्षेत्र असू महिलांनी आपल्या स्वतःला कमी न समजता आव्हानांना सामोरे जावे, असे मार्गदर्शन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सक्षम महिला नेतृत्व पुढे आल्यास त्याचे स्वागत असेल, असेही ते म्हणाले.

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणा-या नवदुर्गा सन्मान सोहळा 2020 पुरस्काराचे पुणे येथे वितरण झाले. त्यावेळी पाटील बोलत होते.  ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष  अशोक वानखेडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक  जेष्ठ पत्रकार संजय भोकरे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, मुंबई वृत्त वहिनी संघाचे रणधीर कांबळे, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस संदीप भटेवरा, कायदेशीर सल्लागार अॅड. मंदार जोशी आदी उपस्थित होते.

कोरोना काळात देशावर संकट आले. या काळात आपापल्या क्षेत्रात आपली जीवाची पर्वा न करता अनेकांनी मोलाचे कार्य केले. हवेली पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली कांबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या  संचालिका निकिता मोघे, डॉ. दीपा शाह अशा कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी ,सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. तसेच या काळात ओंकारा फाउंडेशन व आम्ही पुणेकर या संस्थांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थाच्या पदाधिका-यांचा देखील सत्कार हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन समीर देसाई, सागर बोदगिरे,  विशाल भालेराव, जगदीश कुंभार, मोहित शिंदे, दीपक पाटील, धनराज गरड, ज्योती गायकवाड,  प्रिती देशपांडे, छायाचित्रकार प्रवीण वखारकर आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.