Technology News : इन्स्टाग्रामचा कंटाळा आलाय तर वापरा हे नवीन अॅप

एमपीसी न्यूज  : इन्स्टाग्रामचा कंटाळा आलाय, नवीन काहीतरी ट्राय करायचे आहे अशा युजर्ससाठी एक नवीन अॅप दाखल झाले असून डिस्पो नावाने हे अॅप आले आहे. हे फोटो शेअरिंग अॅप आहे. फोटो शेअरिंग म्हणजे इन्स्टाग्राम अशी जी इन्स्टाग्रामची ओळख होती त्यालाच डिस्पोने आव्हान उभे केले असून अल्पावधीत १कोटी युजर्सने डिस्पो डाऊनलोड केले असल्याचे समजते.

इन्स्टाग्राम आणि डिस्पो मध्ये काही फरक नक्कीच आहेत. इन्स्टाग्राम सतत स्नॅपचॅट सारख्या अॅप वरुन फिचर कॉपी करते तर डिस्पो बेसिक फिचर अॅप बरोबरच राहणार आहे. म्हणजे डिस्पो मध्ये व्हिडीओ साठी काही इफेक्ट नाही, व्हीडीओ मध्ये म्युझिक फिचर नाही. येथे फक्त फोटो अपलोड करता येणार आहेत. तसेच या अॅपचा वापर सध्या तरी सर्व युजर करू शकणार नाहीत तर फक्त इनव्हाइट नुसार याचा वापर करता येणार आहे. सध्या ते आयओएस युजर्स साठी आहे.

डेव्हिड ड्रोबिक या २४ वर्षीय तरुणाने हे अॅप लाँच केले असून यात फोटो एडीट पर्याय दिला गेलेला नाही. देविध मोठा युट्युबर असून त्याच्या कंपनीत ८ कामगार आहेत. कंपनीचे नवे ऑफिस लवकरच जपान मध्ये सुरु केले जात असून अनेक गुंतवणूकदार त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत असे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.