22.8 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Crime News : खासगी जमिनीवर टोळक्याचे बेकायदेशीररित्या अतिक्रमण

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – ताथवडे येथील श्रीचंद आसवाणी यांच्या खासगी 98 गुंठे जमिनीवर 24 ते 25 जणांनी बेकायदेशीर रित्या अतिक्रमण केले असून त्यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.5) सकाळी पावणेसातच्या सुमारास घडला.

याप्रकरणी रामकिसन सखाराम पाटकर (वय.51 रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली असून किरण प्रकाश बुचडे (वय 40 रा. हिंजवडी), संजय आगेलु (रा. ताथवडे), तुषार पवार (पूर्ण नाव माहिती नाही), हरीश मगारामजी माळी (वय. 50 रा. वाकड) व त्यांच्या सोबत आलेले 20 ते 21 व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, जीवननगर ताथवडे येथील श्रीचंद आसवाणी प्लॉटस सर्वे क्रमांक 161 येथील आसवाणी असोसिएटस यांच्या श्रीचंद आसवाणी यांची 98 गुंठेचा प्लॉटमध्ये आरोपींनी बेकादेशीररित्या प्रवेश केला.

यावेळी प्लॉटच्या गेटचे लॉक तोडून,सीसीटीव्ही कॅमेरे खराब केले.तसेच वॉचमनला बसण्यासाठी केलेल्या निवाऱ्यामध्ये घूसून त्याला शिवगाळ व माराहाण केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

spot_img
Latest news
Related news