Bhosari News : भोसरीत दुकानाच्या गल्ल्यासह मंदिराच्या दान पेटीवर ही चोरट्यांनी केला हात साफ

एनपीसी न्यूज – भासरी येथे दोन वेगवेगळ्या चोरीच्या (Bhosari News) घटनांमध्ये चोरट्यांनी दुकानातील साहित्य व मंदिरातील दान पेटीवरही हात साफ केला आहे. दोन्ही चोरीच्या घटना शुक्रवारी (दि.10) उघडकीस आल्या आहेत.

पहिली चोरीची घटना भोसरी येथील गुळवे वस्तीतील नमो स्टील ट्रेडिंग या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 2 लाख 15 हजार रुपयांचे स्टील, कॉपर व ब्रासचे रॉड, बुश व प्लेटचा मुद्देमाल तसेच सीसीटीव्हीचा डिव्हीआर चोरून नेला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात महेंद्र कालीदास कांकरीया (वय 39 रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri Crime : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून एकाला मारहाण

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी भोसरी येथील लांडेवाडी परिसरातील दत्त मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व दानपेटी उचकटून त्यातील 30 हजार रुपये चोरून नेले. (Bhosari News) याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात प्रल्हाद तुकाराम पासलकर (वय 55 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून भोसरी पोलीस चोरांचा तपास घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.