Alandi News :  माऊली मंदिरामध्ये श्री ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत ओवीबद्ध ग्रंथाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्री ज्ञानेश्वर संजीवन चरित्रामृत या ओवीबद्ध ग्रंथाचे  प्रकाशन झाले.त्याचे कवित्व लेखन कवी आप्पा भानुदास कुंभार गुरुजी यांनी केले आहे.

गद्य रुपात संत ज्ञानेश्वर चरित्र  विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.परंतु पद्य रुपात दिसत नाही.पद्यरचना ही मधुर असून अंतरंगला भिडणारी असते. किंबहुना ती आत्म्याची भाषा आहे.या ग्रंथात कुंभार गुरुजी यांनी 18 अध्यायात 3 हजार 500 ओव्यांच्या रूपाने हे ज्ञानदेवांचे चरित्र भाविकांसाठी, वारकऱ्यांसाठी त्यांच्या समोर ठेवले आहे.संत साहित्य प्रचार प्रसारासाठी हा ग्रंथ अमूल्य ठरेल.असे काहींनी मनोगत व्यक्त केले.

या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी देहू देवस्थान अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक,प्रकाशिका सुरेखा गायकवाड तसेच  साहित्यिक मान्यवर व वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.याबद्दलची माहिती आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.