Talegaon Dabhade : खात्रीशीर बाजार भाव मिळत असल्याने सोयाबीन पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रात वाढ

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन पिकास अनुकूल वातावरण व हवामान असून खात्रीशीर बाजार भाव मिळत असल्याने सोयाबीन पिकाच्या लागवडीच्या क्षेत्रामध्ये यावर्षी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मावळ तालुक्यात खरीप भातपीक, सोयाबीन,भुईमूग, कडधान्ये ही पिके खरीप हंगामात घेतली जातात.सोयाबीन पीक पूर्वभागातील इंदोरी, सुदूंबरे, नवलाखउंब्रे,वराळे,नानोली, तळेगाव,,सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे,दारुंब्रे, गोडुंब्रे,धामणे  चांदखेड,परंदवडी, उर्से येथील शेतकरी अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर करत आहे.

मावळच्या पूर्व भागात उत्तम आणि अनुकूल हवामान आणि बेताचा पाऊस यामुळे हे पीक खात्रीने उत्पन्न देते. सोयाबीन पीक घेण्याकडे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल वाढत असून भुईमूग आणि कडधान्य पिकाचे पेरणी क्षेत्र कमी होत चालले आहे.

मागील वर्षी मावळात 307 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीन खरीप पीक घेण्यात आले होते. यावर्षी त्या क्षेत्रात वाढ होऊन चारशे ते पाचशे हेक्टर क्षेत्रापर्यंत हे सोयाबीन क्षेत्र वाढण्याची शक्यता मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.