Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदीमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत नाकाबंदी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपआयुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे.

गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे एक अज्ञात बोट सापडली ज्यामध्ये शास्त्रस्त्र होती.याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, ती बोट ओमानमधील मस्कत येथून जूनमध्ये रवाना होऊन युरोपला जाणार होती पण मध्येच अरबी समुद्रात तिचे इंजीन फेल झाल्याने त्यातील क्रू यांनी मदत मागितल्याने कोरियन युद्धनौकेने त्यांना वाचवले. पण खराब हवामानामुळे त्या बोटीला टोव करून नेता आले नाही. ती बोट भरकटून हरिहरेशवरला पोहोचली.

या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे शहरात पोलीस सक्रिय झाले असून हायअलर्टवर आहेत. दोन्ही शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाढवलेली नाकाबंदी हे हरिहरेश्वर येथील बोटीत शास्त्रस्त्र मिळाल्यामुळे वाढविण्यात आली आहे का असे विचारल्यावर ते म्हणाले की, पुढील काही दिवसात सण व उत्सव असल्याने नाकाबंदी करण्यात येत आहे.

डोळे म्हणाले की, आयुक्तालाय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीसाठी पोलीस वाढवले आहेत.प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाबंदी पॉईंट्सवर लोकांची तपासणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.