Pune News : वीर गोगादेव उत्सवानिमित्त कॅम्प परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

एमपीसी न्यूज – वीर गोगादेव उत्सवानिमित्त पुणे शहरातील कॅम्प परिसरातील वाहतुकीत शुक्रवारी बदल करण्यात आला आहे. कॅम्प येथील न्यू मोदीखाना येथून मुख्य मिरवणूक सायंकाळी 4 च्या सुमारास निघणार आहे.  या उत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतात. यादरम्यान मिरवणूक सोहळ्यात वाहतूकीची कोंडी होऊ नये व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कॅम्प परिसरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. 

 

 

वीर गोगादेव मुख्य मिरवणूक मार्ग

 

सायंकाळी 4 च्या सुमारास न्यु मोदीखाना येथून मिरवणूकीस सुरुवात होवून न्यु मोदीखाना पुलगेट पोलीस चौकी – मेढी माता मंदीर – महात्मा गांधी रोडने डावीकडे वळुन कुरेशी मस्जिद – समोरुन सेंटर स्ट्रीट रोडने सरळ भोपळे चौक – सेंटर स्ट्रीट चौकी – उजवीकडे वळुन महावीर चौक – डावीकडे वळुन महात्मा गांधी रोडने कोहिनुर हॉटेल चौक ते पुलगेट पोलीस चौकी – मेढी माता मंदीर येथे विसर्जन होणार आहे.

 

मिरवणूक चालू झाल्यावर बंद करण्यात येणारे मार्ग व पर्यायी मार्ग –

 

  • वाय जंक्शनवरुन महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतुक ही वाय जंक्शन येथे बंद करुन ती खाणे मारुती चौक येथे वळविण्यात येणार आहे.तसेच सोलापूर रोडला जाणारी वाहतुक ही खाणे मारुती चौक येथून उजवीकडे वळून जाईल व शहरात येणारी वाहतुक ही खाणे मारुती चौकातून सरळ ईस्ट रोडने इंदीरा गांधी चौकातून डावीकडे वळून महावीर चौक व तेथून पुढे एम जी रोडकडे जाईल किंवा इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलीस स्टेशन चौक व तेथून डावीकडे वळून तीन तोफा चौकातून इच्छित स्थळी जाईल.

 

  • मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक बंद करुन सदरची वाहतूक ही चुडामन तालिमकडे वळविणेत येईल.

 

  • व्होल्गा चौकाकडून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदर वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रिटने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

 

  • महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक एम जी रोडने नाझ चौकाकडे वळविण्यात येईल.

 

  • सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबुत स्ट्रिट रोड मार्गे पुढे सोडण्यात येईल.

 

  • बाबाजान चौकाकडून भोपळे चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदर वाहतुक शिवाजी मार्केटकडे वळविण्यात येईल.

 

  • बाबाजान चौकाकडून कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक निशांत टॉकीजकडे वळविण्यात येईल.

 

  • शिवाजीमार्केटकडून सेंटर स्ट्रीट चौकीकडे जाणारी वाहतूक तसेच कोळसा गल्लीकडून एमजी रोडकडे जाणारी वाहतूक ही वाहतूक परिस्थितीनुसार बंद करण्यात येईल.

 

सदर मिरवणुक मार्गावर वाहतूक परिस्थितीनुसार/आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी शुक्रवारी सायंकाळी 4 पासून मिरवणूक संपेपर्यंत उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करुन, वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.