PCMC News : वैद्यकीय सेवेतील दर वाढीनंतर रुग्णालयातील भरणा वाढला

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराच्या दरात वाढ केल्यानंतर रुग्णालयातील भरणा वाढला आहे.(PCMC News) जुलै महिन्यात 79 लाखांचा भरणा झाला होता. तर, ऑगस्ट महिन्यात 1 कोटी 24 लाखांचा भरणा झाला असून जुलैच्या तुलनेत 45 लाखांनी भरणा वाढला आहे.

महापालिकेचे  8 रुग्णालये आणि 29 दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. महापालिका प्रशासकांनी दवाखाने, रुग्णालयातील दरवाढीचा निर्णय घेतला. शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांकरिता 1 ऑगस्टपासून 2022 लागू  केले आहेत. जे रुग्ण केशरी शिधापत्रिकाधारक आहेत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाहीत, अशा रुग्णांनाकडूनही शासनाकडील दरांनुसार दर आकारणी केली जाते.

Pune News : पुण्यात नदी संवर्धनासाठी साखळी उपोषणानंतर मूकमोर्चा

अतिदक्षता विभाग (आसीयू), साईड रुम, सेमी प्रायव्हेट रुमच्या दरात मोठी वाढ केली आहे. नवीन दरांची 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरु झाली. तर, तांत्रिक कारणामुळे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात 17 ऑगस्टनंतर अंमलबजावणी सुरु झाली होती.(PCMC News) महापालिका रुग्णालयांचा जुलै महिन्यात 79 लाख 2 हजार 217 रुपयांचा भर झाला होता. नवीन दर लागू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात 1 कोटी 24 लाख 40 हजार 621 रुपयांचा भरणा झाला. जुलै महिन्याच्या तुलनेत 45 लाख 38 हजार 404 रुपयांनी भरणा वाढला आहे.

याबाबत बोलताना वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”महापालिका रुग्णालयांमध्ये 1 ऑगस्टपासून शासन दरानुसार निर्धारीत केलेले दर आकारले जात आहेत.(PCMC News) राज्यभरात सर्वांत चांगली वैद्यकीय सुविधा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आहेत. वैद्यकीय सुविधांच्या दरामध्ये जास्तीची वाढ झाली नाही. नागरिकांनी याकडे सकारात्मकपणे बघावे आणि सहकार्य करावे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.