Ind Vs SL T20 : पिंपरी चिंचवडचा ऋतुराज गायकवाड आज करणार ओपनिंग, श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या कोरोना संक्रमित झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका संघातील T20 सामना पुढे ढकण्यात आला होता. आज कोण कोण खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी संघ जाहीर झाला असून, पिंपरी चिंचवडचा ऋतुराज गायकवाड कर्णधार धवन सोबत ओपनिंग करणार आहे.

आज भारताकडून देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकारिया T20 पदार्पण करत आहेत. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघातील आठ नियमित खेळाडूंनी कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना या सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हे पाऊल उचलावे लागले. शिखर धवनच्या करोना चाचणीबद्दल शंका होती पण तो देखील पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

भारतीय संघाने पहिला T20 जिंकला असून, दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. तर, श्रीलंका मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.