Pimpri News: औद्योगिकनगरीत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेताविणाऱ्या गीतांची मालिका… रांगोळीच्या आकर्षक पायघड्या…आणि सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि संघटनांनी काढलेल्या दुचाकी तिरंगा फेरी अशा मोठ्या उत्साहात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात साजरा करण्यात आला.(Pimpri News) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षांनी सामुदायिक ध्वजारोहण करण्याची संधी लाभल्याने सर्वत्र झेंडावंदन कार्यक्रम पारंपरिक जल्लोषात झाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली.

अग्निशामक दलाच्या वतीने पाण्याच्या तुषारांद्वारे भारतीय तिरंग्याची प्रतिकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी  ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ असा नारा देत महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रभातफेरी काढली.(Pimpri News)  महापालिकेत  रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मिळून सुमारे 200 जणांनी रक्तदान करून मानवतेच्या महान कार्यामध्ये सहभाग नोंदवला.

राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त  रविकिरण घोडके, चंद्रकांत इंदलकर, संदिप खोत, विठ्ठल जोशी, अजय चारठाणकर, सचिन ढोले, मनोज लोणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. उज्वला आंदूरकर, डॉ. मनिषा सूर्यवंशी, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण,(Pimpri News) मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वामन नेमाणे, बाळासाहेब खांडेकर, सुषमा शिंदे, निलेश देशमुख, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, बाळासाहेब गलबले, डॉ. वर्षा घोगरे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नामदेव ढाके, अमित गावडे, गोविंद पानसरे, माजी नगरसदस्या  अनुराधा गोरखे, मीनल यादव, कर्मचारी महासंघाचे आजीमाजी अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अंबर चिंचवडे  यांच्यासह  महापालिका कर्मचारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

 

Amazon Company : अमेझॉन कंपनीच्या वेअरहाऊसवरील दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

दरम्यान, निगडी भक्ती शक्ती उद्यान या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pimpri News) त्यानंतर निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर शालेय विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजासह विविध प्रतिकृतींचे सादरीकरण करून उपस्थित सर्वांच्याच मनावर राज्य केले. यामध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळा तसेच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या वतीने अधिका-यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक ई-वाहनांचे, अग्निशामक विभागाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या अत्याआधुनिक अग्निशमन वाहनांचे, मनपा मुख्यालय येथे प्लास्टिक मुक्त अभियाना अंतर्गत स्वस्त व वाजवी दरातील कापडी पिशव्यांच्या वेंडिंग मशीनचे तसेच मनपा मुख्यालय येथे लावण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. मनपाच्या वतीने राबविण्यात येणा-या बेस्ट फ्रॉम वेस्ट या स्पर्धेचा देखील शुभारंभ आयुक्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने करसंकलन विभागातील करवसुलीचे काम तृतीयपंथीयांच्या शलाका पथकाला देण्यात आले असून त्याचे नियुक्ती पत्र आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.(Pimpri News) तसेच रिव्हर मार्शल म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांना देखील आयुक्त पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. मनपाच्या आरोग्य सेवेमध्ये 25 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचा-यांना महापालिकेच्या वतीने सोडतीद्वारे मोफत सदनिका वाटप करण्यात आले होते. त्यातील लाभार्थ्यांना देखील आयुक्त पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

महापालिका संचलित, जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज चिखली येथे शाळेच्या नूतन वास्तुमधील पहिला स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजु कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्या डॉ.मृदुला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.(Pimpri News) यावेळी मोठ्या संख्येने  पालक उपस्थीत होते. महापालिकेचे निवृत्त क्रीडा अधिकारी राजु पी कोतवाल, डॉ. जयश्री कोतवाल आणि  महापालिका क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या साठे तसेच सदर शाळेचे संचालक ह.भ.प. राजु महाराज ढोरे आदी उपस्थित होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच काहीं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणे केली.

Hinjawadi : चार लाखांचे बांधकाम साहित्य चोरणारा अटकेत

तृतीयपंथींयांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तृतीयपंथी बांधवांकडून ध्वजारोहण करत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेने माणुसकीचा संदेश देत उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला. सिद्धी कुंभार, रितिका परमार, रिद्धी जाधव, रयत विद्यार्थी विचार मंच  अध्यक्ष धम्मराज साळवे ,महासचिव संतोष शिंदे उपस्थित होते.(Pimpri News) रयत विद्यार्थी विचार मंचाचे शहराध्यक्ष मयूर जगताप ,सचिव प्रगती कोपरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तृतीयपंथींयांचा संविधान राज्य घटना व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या  लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दहावीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या धनश्री पाटीलच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, देशमुख, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, लिटल फ्लॉवर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन सोसायटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका ललिता गिल, ज्योती मोरे, भटू शिंदे, उदय फडतरे, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.