India Corona Update : गेल्या 24 तासांत देशात 15,906 नवे कोरोना रुग्ण,16,479 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 15 हजार 906 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 16 हजार 479 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली आहे, सध्या देशात 1 लाख 72 हजार 594 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 41 लाख 75 हजार 468 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 35 लाख 48 हजार 605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.16 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 4 लाख 54 हजार 269 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 59 कोटी 97 लाख 71 हजार 320 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 40 हजार 158 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 102.10 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 77 जणांचे लसीकरण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.