India Corona Update : गेल्या 24 तासांत ‘सर्वाधिक’ 8380 नव्या रुग्णांची नोंद तर मृतांनी ओलांडला पाच हजारांचा टप्पा

India Corona Update: Shocking! In the last 24 hours, 8380 new cases have been reported and 193 deaths have been reported

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत 8380 नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही एका दिवसात वाढलेली आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. तर 193 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यातील मृतांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे, या दोन धक्कादायक बातम्यांबरोबरच देशातील कोरोनामुक्तांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाण प्रथमच 50 टक्क्यांच्या खाली आले आहे, ही चांगली बातमीही हाती आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आजवर कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 1,82,143 झाली आहे त्याचवेळी 5,164 जणांना (2.84 टक्के) आपला जीव गमावावा लागला आहे. आजपर्यंत 86 हजार 983 रुग्णांनी (47.76 टक्के) कोरोनावर यशस्वी मात केली असून 89 हजार 995 रुग्णांवर (49.40 टक्के) उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या  राज्यांमध्ये महाराष्ट्रात आजवर महाराष्ट्रात 65,168  रुग्ण आढळून आले आहेत तर 2,197 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तमिळनाडु – 21,184 रुग्ण, 160 मृत्यू, दिल्ली – 18,549 रुग्ण, 416 मृत्यू, गुजरात – 16,343 रुग्ण, 1,007 मृत्यू झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने काल लाॅकडाऊन 5.0 ची घोषणा केली असून हाय रिस्क व कंटेंनमेंट झोन मध्ये 30 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी 8 जून पासून हाॅटेल रेस्टॉरंट आणि माॅल व धार्मिक स्थळांना खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मोदी सरकारने या निर्णयाला लाॅकडाऊन 5.0 न म्हणता अनलाॅक 1.0 म्हटले असून फेज 1, फेज 2 आणि फेज 3 अशा पद्धतीने येणाऱ्या काळात लाॅकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.