IPL 2020: राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाला कोरोनाची लागण

IPL 2020: Rajasthan Royals fielding coach tested corona positive दिशांत याज्ञिक सध्या त्यांच्या मूळ गावी उदयपूर येथे आहेत. 14 दिवसांनंतर पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज – आयपीएलची सुरवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्ससाठी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टीमचे क्षेत्ररक्षण कोच दिशांत याज्ञिक यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ते म्हणाले की, पुढील आठवड्यात यूएईला जाण्यासाठी संघाचे सदस्य मुंबईत जमले आहेत. त्या दुष्टीकोनातून ही चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दिशांत याज्ञिक सध्या त्यांच्या मूळ गावी उदयपूर येथे आहेत. 14 दिवसांनंतर पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या प्रोटोकॉल अंतर्गत यूएईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला दोन वेळा कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. 14 दिवसांनंतर दिशांत याज्ञिक यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर याज्ञिक युएईला जाऊ शकणार आहेत.

आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून असून 10 नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दि. 21-22 ऑगस्ट दरम्यान सर्व संघ यूएईला रवाना होऊ शकतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.