IPL 2023 : दिल्लीचा मोठा विजय; धडाकेबाज खेळी करणारा कॉन्व्हे ठरला विजयाचा शिल्पकार

एमपीसीन्यूज : (विवेक कुलकर्णी) सलामीच्या जोडीने केलेल्या (IPL 2023 ) जबरदस्त फलंदाजीला मिळालेली इतर फलंदाजांची साथ आणि नंतर गोलंदाजांनी केलेल्या कमालीमुळे सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सला तब्बल 77 धावांनी मात देत साखळी फेरीतला आपला अंतिम सामना जिंकून शेवटही गोड करत 17 गुणांसह अंकतालिकेत द्वितीय क्रमांक मिळवून आपले प्ले ऑफमधले स्थानही पक्के केले (IPL 2023)आहे.

आयपीएल 2023 च्या साखळी स्पर्धेतले सामने आता जवळजवळ संपत आलेले आहेत, गुजरात संघ सोडला तर इतर तीन स्थानासाठी कमालीची चुरस होती, चेन्नई आजपर्यंत जरी द्वितीय क्रमांकावर असले तरी इतर संघाचे सामने बाकी असल्याने त्यांच्याही प्ले ऑफ मधल्या जागेबद्दल काही प्रमाणात का होईना धाकधूक होती, पण एमएसच्या संघाने आजच्या पहिल्या सामन्यात जबरदस्त खेळ करत सर्व आशंका बाजूला टाकत दिमाखात प्ले ऑफ मध्ये जागा मिळवून आपण ही स्पर्धा चार वेळा उगाच जिंकली नाही हेच सिद्ध केले.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऋतूराज गायकवाड आणि डेव्हान कॉन्व्हे या जोडीने आजही संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.या जोडीने जवळपास 15 षटके दिल्लीच्या गोलंदाजांना निष्प्रभ करत पहिल्या गड्यासाठी 141 धावांची विशाल सलामी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्या उभारण्यासाठी योग्य तो पाया रचून दिला.

ऋतुराज तर आज जबरदस्त फटकेबाजी करत होता ,तो आपले शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच तो वैयक्तिक 79 धावांवर असताना साकरियाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला,या धावा त्याने फक्त 50 चेंडूत केल्या, ज्यामध्ये 3 चौकात आणि 7 षटकार (बरोबर वाचले तुम्ही) सामील होते.

त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने केवळ 9 चेंडूत 3 षटकार मारत 22 धावा केल्या, यामुळे दिल्ली संघ 200च्या पुढेही जाणार हे स्पष्ट झाले.दुसऱ्या बाजूने कॉन्व्हे फोडून काढत होताच, ऋतूराजचे शतक हुकले असल्याने कॉन्व्हेचे तरी होईल असे वाटत असतानाच तो ही 87 धावांवर असताना नोरजेच्या गोलंदाजीवर बाद झाला.त्याने 11 चौकार आणि तीन षटकार मारत केवळ 52 चेंडूत या धावा केल्या.यानंतर जडेजानेही वाहत्या गंगेत हात धुवून घेत वेगवान 20 धावा केल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या 20 षटकात 3 बाद 223 धावा झाल्या.

या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात अतिशय खराब अशी झाली. मागच्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा पृथ्वी शॉ आज केवळ 5 धावा करुन तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर बाद झाला अन दिल्ली संघाला मोठा धक्का बसला, यातून सावरण्याआधीच दीपक चाहरने डावाच्या 5 व्या षटकात (IPL 2023 ) फिलिप सॉल्ट आणि रोसूला बाद करुन दिल्ली संघाच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली. यावेळी दिल्ली कॅपिटल्सची अवस्था 3 बाद 26 होती ,या कठीण प्रसंगी कर्णधार वॉर्नरला साथ द्यायला आला तो युवा यश धुल.

त्याने अतिशय सामंजस्य दाखवत जास्तीत जास्त स्राईक वॉर्नरला देत डाव बऱ्यापैकी सावरत चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली,पण वेगवान धावा ही 20-20 ची मूलभूत अलिखीत अट असल्याने तो नाही म्हटले तरी या दडपणाखाली आपली विकेट जडेजाच्या गोलंदाजीवर गमावून बसला. यानंतर अक्षर पटेलने काही प्रमाणात प्रतिकार केला खरा, पण तो ही केवळ 15 धावा करून बाद होताच दिल्ली संघाचा पराभव होणार हे स्पष्ट झाले, कर्णधार वॉर्नर एकहाती किल्ला लढवत होता, त्याच्या बॅट मध्ये सामना जिंकून द्यायची धमक याआधी कित्येक वेळा सिद्ध झाली असल्याने दिल्ली समर्थक अशाच चमत्काराची वाट बघत होते.

Maharashtra : 28 मे रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या संसदेचे उद्घाटन; स्वातंत्र्यवीर सावकरांचा अनोखा सन्मान?

पण त्याची झुंजार खेळी 86 धावाकरुन समाप्त होताच दिल्ली संघाच्या (IPL 2023) उरल्यासुरल्या आशाही समाप्त झाल्या,अखेर दिल्ली संघ 77 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला अन या मोठ्या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज प्ले ऑफ साठी दिमाखात पात्र ठरला,दिल्ली संघ या आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता, गुजरात पाठोपाठ चेन्नई हा दुसरा संघ पात्र ठरल्याने आता तीन व चार क्रमांकावर कोण या प्रश्नाचे उत्तर उद्या(IPL 2023) मिळेल.

मुंबई ,एलएसजी,आरसीबी की राजस्थान रॉयल.. कोण असेल यासाठी फक्त काही तास वाट पाहूया.

संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज
3 बाद 223
ऋतूराज 79,कॉन्व्हे 87,दुबे,22,जडेजा नाबाद 20
खलील 45/1,साकरिया 36/1,नोर्जे 43/1
विजयी विरुद्ध
दिल्ली कॅपिटल्स
9 बाद 146
वॉर्नर 86,यश 13,अक्षर 15,
चाहर 22/3,तिक्षणा 23/2,पथीराना 22 /2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.