Pune : जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती टाटा मोटर्स येथे गुणवत्ता दिन म्हणून साजरी

ग्राहकाबद्दल स्नेह हे उद्योगाचे ब्रीद वाक्य - एच जी रघुनाथ 

एमपीसी न्यूज – जे. आर. डी. टाटा यांची 114 वी जयंती गुणवत्ता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. 28 जुलै 2018 रोजी टाटा मोटर्सच्या पुणे येथील कारखान्यामध्ये सदर दिवस ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेल येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी विभागातील समूह व वैयक्तिक कर्मचारी ज्यांनी टाटा वाहनांमध्ये गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केलेल्या योग्यदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एच जी रघुनाथ, टायटन कंपनीचे माजी सीईओ व टाटा सन्सचे स्वतंत्र सल्लागार हजर होते. रघुनाथ यांचे नाव म्हणजे गुणवत्ता अशी त्यांची ख्याती असल्याचे संबोधले जाते. 1986 साली रघुनाथ एच एम टी कंपनीतून टायटन येथे रुजू झाले व त्यावेळी रघुनाथ हे विक्री व विक्रीपश्चात सेवेचे जाळे सांभाळत होते.

ह्या प्रसंगी सर्वश्री अलोक सिंग, प्लांट हेड (सीव्ही पुणे), जयदीप देसाई प्लांट हेड (पीव्ही पुणे), व्ही सुरेश हेड (कॉर्पोरेट एच आर), अनिल सिन्हा हेड (क्वालिटी सीव्ही), चेतन चावला हेड (क्वालिटी पीव्ही), अरुण बालिमनी हेड (क्वालिटी), सरफराज मणेर हेड (एच आर), रवी कुलकर्णी हेड (ई आर), समीर धुमाळ अध्यक्ष टीएमईयु पुणे, इतर सर्व वरिष्ठ अधिकारी व युनियनचे पदाधिकारी ह्या प्रसंगी हजर होते.

सर्व वरिष्ठांनी चांगल्या गुणवत्तेचे महत्व व त्यासोबतचे त्याचे  संबोधनामध्ये भर दिला. मागील वर्षी कंपनीने बदलासाठी घेतलेला पुढाकार म्हणून गुणवत्ता सुधारणेसाठी शून्य दोष स्टेशन, पीएफएमईए इत्यादी गोष्टींचा अवलंब चालू केला. आयपीटीव्ही-प्रत्येक हजार वाहनांमागे असलेल्या दोषांच्या संख्येमध्ये सुद्धा चांगल्या पैकी सुधारणा झाली आहे.

सतिश बोरवणकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (क्वालिटी) अँड सीओओ त्यांच्या व्हिडिओद्वारे दिलेल्या संदेशामध्ये उत्पादन विभागातील काम करणा-या कर्मचा-यांकडून आलेल्या सुधारणा व अभिप्राय ह्यावर भर देऊन त्याचे महत्व समजावून दिले. उत्पादन विभागातील कर्मचा-यांना महत्व देताना त्यांनी केलेली खर्चातील कपात, गुणवत्तेत सुधारणा ह्याबाबत दिलेल्या सूचनांचा विचार व त्याची अंमलबजावणी करण्यात येते असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमा दरम्यान गुणवत्तेसाठी काम केलेल्या वैयक्तिक व सांघिक उत्कृष्टता साध्य केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. ह्या प्रसंगी टाटा मोटर्स मॅन ऑफ द इयर व डिव्हिजनल मॅन ऑफ द इयर हे पुरस्कार मिळालेल्या कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

टाटा मोटर्स मॅन ऑफ द इयर नरेंद्र चिखले यांना बहाल करण्यात आला. चिखले यांनी जी-85 गिअर बॉक्सच्या उत्पादनामध्ये वेळ वाचवून खर्चात कपातीसाठी मोठे योगदान  त्यांनी सर्व प्रकारच्या गिअर बॉक्ससाठी कॉमन लिफ्टिंग टॅकल तयार केल्या बद्दल  पेटंट सुद्धा मिळाला आहे. नरेंद्र यांच्या योगदानामुळे हेक्साच्या गिअर बॉक्समध्ये असलेल्या तक्रारी (सात वरून दोन) इतक्या कमी झाल्या. त्यांच्या सूचनांमुळे वॉरंटीच्या खर्चात वर्षाला चार लाखांची बचत झाली. ह्या सोबत नरेंद्र सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी होत असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे.

रघुनाथ यांनी यावेळी सर्व सामान्यांच्या आयुष्यातील अनेक उदाहरणे जी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात व त्याचे गुणवत्तेशी महत्व पटवून दिले. त्यांनी ग्राहकांच्या दृष्टिकोनातून गुणवत्तेच्या महत्वावर अधिक भर दिला. ग्राहकांच्या आवडीमध्ये होत चाललेला बदल पाहता गुणवत्तेच्या व्याख्यामध्ये बदल झाला असून ग्राहकाबद्दलचा स्नेह हे ब्रीद वाक्य सध्याच्या काळात आचरात आणावे असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.