गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Panshet News : नरवीर तानाजी मालुसरे जलाशयाचे जलपूजन

एमपीसी न्यूज – पानशेत येथील नरवीर तानाजी मालुसरे (पानशेत) जलाशय शंभर टक्के (पूर्ण क्षमतेने) भरल्याने या जलाशयाचे जलपूजन गुरुवारी सकाळी पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व पानशेत धरण प्रकल्पातील विविध खेड्यापाड्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या प्रसंगी माणगाव सहकारी दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन चिंतामण पोळेकर, ज्येष्ठ पत्रकार शांताराम ठाकर, ज्ञानोबा (माऊली) कांबळे, देवीदास ठाकर, महादेव पासलकर, भालचंद्र सोनवणे, विजय पासलकर, दत्तात्रय निढाळकर, नानासाहेब देशमुख, गणेश तारू, नरवीर तानाजी मालुसरे(पानशेत धरण) जलाशयाच्या काठावरील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सभासद व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news