Khadakwasla News : खडकवासलातून मुठा नदीत 9 हजार 416 क्युसेक विसर्ग सोडणार

 एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे गुरुवारी दुपारी 2 च्या  दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये साधारण 9 हजार 416 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या गावांनी व पुणे शहरातील लोकांनी सतर्क रहावे.

यापूर्वी गुरुवारी सकाळी दुपारी 12 दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 1712 क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तो वाढवून दुपारी 12 वा 3,424 क्युसेक विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले आहे.खडकवासला धरण हे मुठा नदीवर बांधण्यात आले आहे. त्यामुळे मुठा नदीच्या लोकांनी सतर्क रहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.