Pune News : जिओ टेक्निकल सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – जिओ टेक्निकल सोसायटीचे हे 75 वे वर्ष आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सीओईपी पुणे येथे शुक्रवारी (दि.2) साजरा करण्यात आला. (Pune News) IGS पुणे चप्टर चेअरमन विकासजी पाटील COEP Technological University चे कुलगुरु मुकुल सुतवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

75 वर्षाच्या निमित्ताने इंडियन जिओटेक्नीकल च्या नवीन लोगोचे अनावरण या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यानंतर IGS च्या नवीन लोगोचे अनावरण चंद्रकात पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सीईओपी च्या पुढील रोडमॕपच्या चित्रफीतीचे पाटील यांच्य हस्ते अनावरण झाले.

Pune News : केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीची अल्पवयीन तरूणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

दोन्ही मान्यवरांच्या सत्कारानंतर 168 वर्षे झालेल्या सीईओपी या संस्थेचा दैदिप्यमान परिचय सीईओ पी विद्यापीठाचे कुलगुरू सुतवणे यांनी ओघवत्या शैलीत दिला.(Pune News)या कार्यक्रमात जिओसायन्सचे अभ्यासक रमेश कुलकर्णी व COEP चे माजी बोर्ड डायरेक्टर व जनसेवा सहकारी बँक हडपसर चे अध्यक्ष डाॕ.राजेन्द्र हिरेमठ या दोघांचा सत्कार करण्यात आला.

जिओ सायन्स म्हणजेच अर्थ सायन्स . जो सीवील इजिनीयरींग चा हा गाभाच. जगातील अनेक स्थापत्य शास्त्रातील आश्चर्य जिओटेक्नीकल इजिनीयरींग च्या अभ्यासाने उभी झाली आहेत. याचा जिओटेक्नीकल इजिनीयरींगचा प्रसार व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

विकास पाटील यांनी आयजीएस या सोसायटीचा परीचय करुन दिला ते म्हणाली की, आम्ही शेतकरी ते विद्यार्थी यांना कनेक्ट कसे करतो. ते सांगितले.जमिनीचा अभ्यास करुन कुठलेही structure बांधायला उत्तम मजबूत पाया करणे हे या विषयाचे काम. (Pune News) जिओ टेक्नीकल इंजिनीयरींग हा सीव्हील इनजिनीयरींग चा गाभा आहे.पुढील भविष्यात आम्ही काय करणार आहोत याचा विकासजींनी पूर्ण रोड मॕप मांडला.त्यानंतर आयजीएस सोसायटी ची माहीतीपूर्ण क्लीप दाखविण्यात आली.प्रा.सुतवणे सरांनी सीईओपी या संस्थेचा परीचय देत पुढील कामगिरीचा रोडमॅप मांडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.