Kalewadi News : डोक्याला पिस्तूल लावून चोरली कार आणि दुकानातील दागिने

एमपीसी न्यूज – डोक्याला पिस्तूल लावून दुकानातून फॉर्मिंगचे दागिने, मालकाच्या अंगावरील दागिने आणि कार तीन ते चार चोरट्यांनी पळवली. आर के गोल्ड दुकान, मेन रोड, काळेवाडी येथे रविवारी (दि.20) ही घटना घडली.

मनसुखलाल घिसुलालजी राठोड (वय 55, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन ते चार अनोळखी चोरट्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काळेवाडीत आर के गोल्ड नावाचे फॉर्मिंग दागिन्यांचे दुकान आहे. आरोपींनी दुकानात घुसून दुकानातील फॉर्मिंगचे दागिने, फिर्यादी व कामगारांच्या खिशातील मोबाईल, सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 39 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच फिर्यादी यांच्या डोक्याल पिस्तूल लावून त्यांची चारचाकी चोरी करून फरार झाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.