Wakad Crime:जुन्या वादातून दुकानदार महिलेला मारहाण करत दुकानाची तोडफोड

एमपीसी न्यूज : जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने किराणा दुकानात तोडफोड केली. तसेच लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारून महिलेला जखमी केले. (Wakad Crime) ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी विजयनगर, काळेवाडी येथे घडली.

रोहित गायकवाड (वय 22), वैभव गायकवाड (वय 25, दोघेही रा. पवनानगर, काळेवाडी), सचिन गुंड (वय 21), अभय दिगंबर सोनकांबळे (वय 21, रा. काळेवाडी) व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. 31) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभय याला पोलिसांनी अटक केली आहे.

Carrom Competition : कॅरम स्पर्धेत पुरुष गटात अभिजित त्रिपणकर तर महिला गटात पुष्कर्णी भट्टड यांना अजिंक्यपद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती व मुलासोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी फिर्यादीच्या किराणा दुकानात आले.(Wakad Crime) दुकानातील काउंटर व फ्रीजचे काच, दुकानातील सामानाचे दोन लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच लाकडी दांडके व लोखंडे रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी आरोपी आले असता ते चुकवण्यासाठी फिर्यादी बाजूला सरकल्या. त्यावेळी फिर्यादीच्या हाताला मार लागून जखम झाली. या घटनेचा वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.