Kamshet : गुराख्याचा आकस्मित मृत्यू

एमपीसी न्यूज : कामशेत शहराजवळच्या सांगिशे गावाच्या हद्दीमध्ये एका शेतामध्ये गावाचा गुराखी राजु  ( पूर्ण नाव समजु शकले नाही ) ( वय अंदाजे 35-40 ) याचा आकस्मित मृत्यू झाला. याप्रकरणी सांगिशे गावचे पोलीस पाटील विजय भीमराव गरुड ( वय 38 ) यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल साईनाथ गरुड यांच्याकडे गुरे राखण्याचे काम करणारा गुराखी राजु ( पूर्ण नाव समजु शकले नाही ) हा कालिदास गणपत ढमाले यांच्या मालकीच्या शेतात रस्त्याच्या कडेला निपचित पडलेला असल्याची माहिती अमोल गरुड यांनी पोलीस पाटील विजय भीमराव गरुड यांना दिली. त्याच्याजवळ जाऊन पाहिल्यावर तो मृत असल्याचे समजले. याप्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.