Alandi news : कार्तिकी यात्रे निमित्त पोलीस प्रशासनाकडून भाविकांकरिता सेवा सुविधा व नियोजन व्यवस्था

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आळंदी व दिघी पोलीस स्टेशन हद्दीत दि.17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव उत्साहात भक्तिमय,वातावरणात,शांततेत, (Alandi news) निर्विघ्नपणे पार पडावा या करिता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून भाविकां करिता सेवा सुविधा व नियोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

चिंचवड येथील आयुक्तांलयाकडून सहा.पोलीस आयुक्त 8 पोलीस ,निरीक्षक 50,पोलीस उपनिरीक्षक 193,पोलीस अंमलदार 1250,वाहतूक पोलीस अंमलदार 250,होमगार्ड 650,असा बंदोबस्त नेमण्यात येणार असून एसआरपीएफ च्या 3 कंपन्या,एनडीआरएफ च्या 2 तुकड्या ,बीडीडीएस चे 2 पथके मदतीला पाचारण करण्यात आले आहेत.

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांचे वाहनां करिता पिवळ्या रंगाच्या व स्थानिकांचे वाहनां करिता गुलाबी रंगाचे  असे वेगवेगळे पास तयार करण्यात आले असून ज्या भाविकांना व स्थानिकांना पास पाहिजे असल्यास त्यांनी आळंदी पोलीस स्टेशन ला अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा. (Alandi news) यात्रा कालावधीत दि.19 ,20,21,22 तारखांना आळंदी शहरात रस्त्यावर भाविकांची तुडुंब गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्थानिकांनी तसेच भाविकांना आपली वाहने 19 तारखेच्या आत आपली वाहने पार्किंगचे ठिकाणी लावावीत परत ती शक्यतो बाहेर काढू नयेत.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या यात्रा कालावधीत आळंदी शहरात येणारे रस्त्यावरून वारकरी भाविकांच्या दिंड्याची वाहने तसेच अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहने वगळून इतर वाहनांना आळंदी शहराकडे प्रवेश बंदी व पर्यायी मार्गाचा वापर याबतत अद्यादेश काढले आहेत.

Swarvandana : फुलला मनी वसंत बहार…सुश्राव्य पदांचा-बंदिशींचा आनंद घेत अनुभवली ‘स्वरवंदना’

वाहतूक व्यवस्थे मध्ये करण्यात आलेले बदल असे आहेत.पुणे-आळंदी रस्ता (मॅगझीन चौक नाकाबंदी ) मॅगझीन चौक (रोड बंद ठिकाण),पर्यायी मार्ग पुणे -दिघी मॅगझीन चौक-भोसरी-मोशी-चाकण.मोशी-देहूफाटा रस्ता (डुडुळगाव जकात नाका नाकाबंदी)हवालदार वस्ती(रोड बंद ठिकाण) ,पर्यायी मार्ग मोशी-चाकण -शिक्रापूर,मोशी-भोसरी-मॅगझीन चौक-दिघी.चाकण (आळंदी फाटा )आळंदी रस्ता (इंद्रायणी हॉस्पिटल नाकाबंदी)आळंदी फाटा(रोड बंद  ठिकाण),पर्यायी मार्ग चाकण- मोशी -मॅगझीन चौक -दिघी-पुणे(पुणे बाजूकडे जाण्याकरिता),चाकण -शिक्रापूर -नगर हायवे पुढे सोलापूर हायवे.

वडगांव घेनंद (शेलपिंपळगाव फाटा)आळंदी रस्ता (कोयाळी कमान नाकाबंदी) कोयाळी फाटा (रोड बंद ठिकाण),वडगांव घेनंद -शेलपिंपळगाव फाटा-चाकण-नाशिक हायवे रोडने पुणे.मरकळ -आळंदी रस्ता (पी सी एस कंपनी फाटा नाकाबंदी) धानोरे फाटा /पीसीएस चौक फाटा(रोड बंद ठिकाण) पर्यायी मार्ग मरकळ – सोळू-धानोरे-चऱ्होली खुर्द (पीसीएस कंपनी फाटा )बायपास  रोडने चऱ्होली बु.पुणे,मरकळ -कोयाळी-वडगांव घेनंद-पिंपळगाव फाटा-चाकण.चिंबळी(चिंबळी फाटा)-आळंदी रस्त्या (केळगाव बायपास नाकाबंदी)चिंबळी फाटा(रोड बंद ठिकाण)पर्यायी मार्ग चिंबळी -मोशी -भोसरी -मॅगझीन चौक- दिघी -पुणे.आळंदी लोणीकंद रस्त्यावरील मरकळ गावाजवळील इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक झाल्याने मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशाने सदरचा पूल वाहतूकीस बंद करण्यात आला आहे.

त्याकरिता दुतर्फा मोठी लोखंडी  आडवे बार लावण्यात आले आहेत.त्यामुळे सदरच्या पुलावरून 3 मीटर पेक्षा उंच असलेली वाहने आळंदीकडे येऊ शकत नाहीत.( Alandi news) तरी अहमदनगर रोडने लोणीकंद बाजूकडून येणारे दिंड्यांचे ट्रक व इतर उंच वाहने यांनी पर्यायी मार्गाने लोहगाव गोलेगाव मार्ग किंवा शिक्रापूर -शेलपिंपळगाव मार्गे आळंदी शहरात यावे असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेच्या अनुषंगाने मंदिर व आळंदी शहर तसेच परिसरात सुमारे 235 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सदरचे कॅमेरे द्वारे संपूर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यात येणार असून संपूर्ण यात्रे अनाऊसिंग सिस्टीम बसविण्यात आले असून कॅमेऱ्यांचे कंट्रोलरुम पोलीस स्टेशन  मधूनच सीसीटीव्ही द्वारे अपप्रवृत्तीवर लक्ष ठेवून अनाऊसिंग सिस्टीम द्वारे भाविकांना सुरक्षेविषयक सूचना देण्यात येणार आहेत.

Baby leopard : जुन्नर तालुक्यातील शिरोली गावात उसाच्या शेतात सापडलेल्या तीन बछड्यांचे व आईचे मिलन

भाविकांचे मदतीकरिता आळंदी शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आले असून सदर ठिकाणावरून भाविकांना मदतपर सूचना व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच यात्रेनिमित्त येणारे दिंड्यांचे ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमणेत येणार आहे.यात्रा काळात आळंदी शहरात रस्त्यावर व फुटपाथवर हातगाडी ,फेरीवाले ,पथारीवाले,हॉकर्स यांच्यामुळे भाविकांची चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. (Alandi news) त्यामुळे 6 हॉकर्स स्कॉड तयार करण्यात आले आहेत.त्यामुळे पथारीवाले,हातगाडीवाले,फेरीवाले, हॉकर्स यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर न बसता आळंदी नगरपरिषदेकडून ठरवून दिलेल्या ठिकाणीच दुकाने लावावीत.भाविकांना काही अडचण अथवा समस्या आल्यास तत्काळ उपाययोजना म्हणून नजीकचे पोलीस मदत केंद्र किंवा 112 नंबर वर तात्काळ कळवावे.याबाबत माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.