Kasarwadi News : एड्यू विहानचे पुण्यात पदार्पण, पिंपरी चिंचवडच्या दोन शाळांची निवड

एमपीसी न्यूज- एड्यू विहान पुण्यात आपली शाखा सुरू करत आहे. यासाठी त्यांनी भोसरीतील SPG पब्लिक स्कूल व ज्यनिअर कॉलेज आणि जय हिंद पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांची निवड केली आहे. एड्यू विहानचा स्वागत कार्यक्रम शुक्रवारी (दि.11) कासारवाडी येथे पार पडला.

या क्रार्यक्रमासाठी एड्यू विहान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक एमके वर्मा यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. वर्मा यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील 11 देशांत 49 नाविन्यपूर्ण तज्ज्ञ मंडळीमध्ये वर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 2021 मध्ये एशिया एशियन एज्युकटर पुरस्कारचे नामांकन त्यांना प्राप्त झाले आहे.

एड्यू विहान संस्थेच्या वतीने दिल्ली वरून सात जणांचा टीम कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी कै. बबनराव गबाजी गवळी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस. पी. जी. पब्लिक स्कुल, चिखली, भोसरीचे अध्यक्ष, पांडुरंग गवळी, महापौर ऊषा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ निकम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, शिक्षण सभापती मनीषा पवार, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर गवळी, माध्यमिक व उच्चमाध्यमिक क्रीडा शिक्षक अध्यक्ष फिरोज शेख, माध्यमिक व उच्चमाध्यमिक क्रीडा शिक्षक सचिव निवृत्ती काळभोर, तळेगाव दाभाडे नगरसेविका संगिता शेळके, भोसे गावचे सरपंच दिपक लोणारी, उपसरपंच सर्जेराव लोणारी, SPG इंटरनॅशनल स्कूल & ज्युनिअर कॉलेजचे सचिव नितीन मधूशेठ, एम. डी. लोणारी सोशल ग्रुपचे संचालक प्रसाद गुंडगळ, संजय वहिले आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन SPG चे अध्यक्ष पांडुरंग गवळी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री सुरवसे व भाऊसाहेब कोकाटे यांनी केले व आभार प्रदर्शन मा. श्री पांडुरंग गवळी यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील अधिक माहिती, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने SPG व जयहिंद या शाळा एड्यू विहान सोबत संलग्न होऊन काम करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.