Kasba Peth Bye-Election : मतदारांनो, मतदार यादीतील नाव तपासून घ्या; निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार 215 कसबापेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक घोषित झाली असून मतदारांनी आपली (Kasba Peth Bye-Election) व आपल्या कुटुंबियांची मतदार यादीतील नोंद ऑनलाईन पद्धतीने तपासून घ्यावी, असे आवाहन कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले आहे.

मतदारांनी nvsp.in या संकेतस्थळावर  ‘वोटर सर्च’ या पर्यायाचा वापर करावा. 80 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 98 विद्यार्थ्यांची निवड

याकरीता मतदारांना ‘नमुना 12 डी’ हा अर्ज आपले कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत वाटप करण्यात येत आहेत. टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याच्या (Kasba Peth Bye-Election) सुविधेचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी सदर अर्ज  मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ भरून द्यावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.